Follow us on :

सत्यवादी ह्युमन राईटस चे उद्देश:

१. सर्वसामान्य जनतेला एकत्र आणुन त्यांच्या मध्ये सामाजिक ऐक्याची, समानतेची बंधुत्वाची राष्ट्रीय एकात्मतेची भावना जागृत करणे, समाजामध्ये अनेक उत्सवाच्या माध्यमातून एकत्रितपणा व आपुलकी भावना जागृत करणे.
   
२. सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, कला, क्रीडा क्षेत्रात गौरवास्पद कामगिरी केल्याबद्दल संबंधित कर्तबगार नागरिकांचा सत्कार करणे.
   
३. शिक्षणाचा प्रसार करणे त्यासाठी शैक्षणिक दृष्ट्या गोर-गरिबांच्या मुलांसाठी अंगणवाडी, बालवाडी, प्राथमिक शाळा, माध्यमिक महाविद्यालये,मेडिकल कॉलेज, इंजिनिअरींग कॉलेज बोर्डिंग, हायस्कुल, मुला - मुलींचे स्वतंत्र वस्तीगृह, अनाथश्रम, विधवाश्रम, अपंग व मुकबधिर विध्यालये स्थापन करणे तसेच विविध प्रकारची शिक्षणाची सोय करून घेणे.
   
४. युवक / युवतींना तांत्रिक शिक्षणाचे महत्व पटवून देणे त्यासाठी तांत्रिक प्रशिक्षण वर्ग सुरु करणे. भरतकाम, विनकाम, इत्यादी प्रकारे महिलांना प्रशिक्षण देणे व सुशिक्षित बेरोजगार व गरीब गरजू महिलांना छोट्याश्या उद्योग धंद्याची माहिती करून देणे, लघु उद्योग, भरतकाम, शिवणकाम उद्योग त्यांचे प्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनविणे.
   
५. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविणे आजु बाजुच्या परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करणे. तसेच नागरिकांच्या मुलभुत समस्यांचे निमुर्लन करणे, त्यासाठी चर्चासत्रे परिसंवाद व्याखाने आयोजित करणे व त्यांच्या दैनंदिन विकास साधुन एक प्रकार उन्नती करणे.
   
६. विध्यार्थी / विध्यार्थीना संगणकाचे महत्व पटवून सांगणे व संगणकाचे विविध प्रकारचे प्रशिक्षण वर्ग सुरु करून त्यांना स्वावलंबी बनविणे.
   
७. कलेद्वारे विविध प्रकारे सामाजिक समस्यांचे महत्व पटवून देणे व कलेची जोपासना करणे त्यासाठी विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे, स्टेज शो, नाटक, आर्केस्ट्रा इत्यादी आयोजित त्याद्वारे प्रबोधन करून प्रशिक्षण केंद्रे स्थापन करून कलावंतांना संस्तेतर्फे प्रोत्साहन देणे.
   
८. गोर गरीब गर्जुनला वैध्यकिय मदत करणे, रुग्णांना रुग्णवाहिकेची सोय उपलब्ध करणे त्यासाठी धर्मार्थ दवाखाने स्थापना करणे व कॅन्सर, एड्स, टी.बी. रोगा बाबत वैधकीय शिबीर तसेच नेत्रदान, रक्तदान शिबिरे आयोजित करून त्यांना सर्व प्रकारचे साहाय्य मुदत करणे व त्याबाबत मार्गदर्शन करून त्याची समस्या सोडविणे.
   
९. नैसर्गिक, भूकंपग्रस्त, पूरग्रस्त, अतिपर्जन्य दुष्काळ, आग, लोकांना वेळोवेळ मदत करणे.
   
१०. युवक / युवती मध्ये देश / विदेशी खेळा बद्दल आवड निर्माण करण्यासाठी क्रीडा शिबिरे स्पर्धा प्रशिक्षण देणे विविध खेळाबद्दल स्पर्धा / सामने आयोजित करून खेळाडूस पारितोषिक देणे.
   
११. वकृत्व निबंध, चित्रकला, नृत्य, गायन विविध कार्यक्रम आयोजित करणे.
   
१२. निरनिराळे राष्ट्रीय सण, थोर पुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथी, सार्वजनिक उत्सव साजऱ्या करणे, त्याद्वारे लोक प्रबोधन करणे.
   
१३. माता बालसंगोपन सकस आहार कुटूंब कल्याण बाबतच्या योजनेसाठी मार्गदर्शन करणे.
   
१४. शासनाच्या विविध महिला बाल कल्याणच्या योजनांची माहिती मिळवून देण्याचा प्रयत्न करणे.
   
१५. महिलांच्या सर्वांगिण विकासासाठी मार्गदर्शन शिबिरे आयोजित करणे व अन्याय निराश्रीत व परिसरातील गरीब गरजू महिलांच्या विकासासाठी व उन्नतीसाठी प्रयत्न करणे व हुंडाबळी संदर्भात बळी पाडणाऱ्या महिलांच्या समस्यांचे निवारण करणे, समस्या सोडविणे, दुर्बल महिलांच्या सर्वांगिण विकास करणे.
   
१६. महिलांना येणाऱ्या विविध अडचणी सोडविण्यासाठी शासनाच्या नियमाला बांधील राहून त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी मार्गदर्शन करणे, प्रयत्न करणे, मदत करणे व त्यांना रोजगार मिळवून देणे.
   
१७. महिलांना विमा संरक्षण योजनेसारख्या योजनांचे महत्व पटवून देणे, प्रशिक्षण देणे, प्रोत्साहन देणे.
   
१८. राज्यात कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्यक्षेत्रात कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे समान संरक्षण नाकारले जाणार नाही.
   
१९. राज्यात केवळ धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या अथवा यापैकी कोणत्याही कारणावरून कोणत्याही नागरिकांला प्रतिकुल होईल अशाप्रकारे भेदभाव करणार नाही.

मुलभूत कर्तव्ये :

१. संविधानाचे पालन करणे आणि राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे.
   
२. ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वतंत्र लढ्यास स्फूर्ती मिळाली त्या उदात्त आदर्शाची जोपासना करून त्याचे अनुसरण करणे.
   
३. भारताची सार्वभौम, एकता व एकात्मका उन्नत राखणे व त्यांचे संरक्षण करणे.
   
४. जेव्हा आव्हान केले जाईल तेंव्हा देशांचे संरक्षण करणे व राष्ट्रीय सेवा बजावणे.
   
५. धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन अखिल भारतीय जनतेमध्ये एकोपा व मातृभाव वाढीला लावणे, स्त्रियांना प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथा सोडणे.
   
६. आपल्या संमिश्र संस्कृतीचा वारशाचे मोल जाणून तो जतन करणे.
   
७. अरण्य सरोवरे नद्या व वन्य जीवसृष्टी या सुद्धा नैसर्गित पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे आणि सजीव प्राण्याबाबत दयाबुद्धी बागळणे.
   
८. विज्ञान निष्ठ दृष्टीकोन, मानवतावाद आणि शोधक बुद्धी व सुधार्नावाद यांचा विकास करणे.
   
९. सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे व हिंसाचार निग्राह पुर्वक त्याग करणे.
   
१०. राष्ट्र सतत उपक्रम व सिद्धी त्यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल अशा प्रकारे सर्व व्यक्तिगत व सामुदायिक कार्यक्षेत्रात पराकष्टेचे यश संपादन करण्यासाठी झटणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य असेल.