Follow us on :

मानवी हक्क आयोगाच्या तक्रारीबाबत माहिती

१. मानवी हक्क आयोगाकडे तक्रार करताना न्यायालयीन मुद्रांक तिकिट लागणार नाही.
   
२. मानवी हक्क आयोगाकडे करावयाची तक्रार ही मराठी, इंग्रजी व हिंदी या पैकी कोणत्याही एका भाषेत असावी. (महाराष्ट्रात)
   
३. मानवी हक्क आयोगाकडे दाखल केलेल्या तक्रारींची नोंदणी तीन दिवसांच्या आत होईल.

आपणांस मानवी हक्क आयोगाकडे तक्रार दाखल करावयाची असल्यास खालील बाबी आपल्या तक्रारीत अंतर्भूत असणे आवश्यक ठरते.

१. संपुर्ण नाव
   
२. पत्र व्यवहाराचा संपुर्ण पत्ता
   
३. घटनास्थळ व कोणाविरुद्ध व कोणत्या लोकसेवक विभागाविरुद्ध तक्रार केली आहे, त्याची माहिती.
   
४. घटनेची तारीख व किती कालावधी तक्रार केली आहे याची माहिती.
   
५. मानवी हक्काचे उल्लंघन झाल्याबाबतची विस्तृत माहिती.
   
६. आपली तक्रार कोणत्याही न्यायालय / न्ययाधिकार आयोगाकडे प्रलंबित आहे का याची माहिती.

मानवी हक्क संरक्षण कायद्यानुसार काम करणाऱ्या आयोगाला कोणते अधिकार आहेत पुढील प्रमाणे:

१. सत्यवादी ह्युमन राईटस यांच्याकडे तक्रार आल्यास किंवा तक्रारदाराच्या नातेवाईकाने तक्रार केल्यास किंवा आयोग स्वतःच कोणत्याही बाबींची दाखल घेते हे पाहणार कि,
 
अ. तक्रारदार किंवा ज्याला त्रास झालेला आहे, अशा व्यक्तीच्या:
  १. मानवी हक्काचे उल्लंघन झाले आहे का?
  २. असे मानवी हक्काचे उल्लंघन सरकारी झाले आहे का ? किंवा शक्य असतानाही त्याने तसे होऊ नये म्हणून काही प्रयत्न केलेला आहे का ह्याचा तपास घेणे.
   
ब. कोणत्याही न्यायालयात मानवी हक्काचे उल्लंघनाबाबत चालणाऱ्या तक्रारी मध्ये सदर न्यायालयाच्या परवानगी ने दखल घेणे.
   
 
क. कोणत्याही कायद्यात काहीही म्हटले असेल तरीही कोणत्याही तुरुंगाला किंवा कोणत्याही सरकारी कचेरीस संस्थेस भेट देऊन ज्या व्यक्तींना विविध कायद्या अंतर्गत ताब्यात घेतलेले आहे असा कोणताही आरोपी वा गुन्हेगाराचे मानवी हक्कांचे उल्लंघन होत नाही ना ह्याबाबत तपास घेणे व त्याबाबत सरकारला सुचना करणे.
   
ड. मानवी हक्कांचे उल्लंघन रोखण्यासाठी अस्तित्वात असणाऱ्या कायद्यान मध्ये बदल सुचविणे आणि त्यांच्या योग्य अंमल बजावणी होण्यासाठीचे मार्गदर्शन करणे.
   
इ. अतिरेकीबाबत योग्य अशी दखल अंदाजी घेण्याबाबत पाठपुरावा करणे. कारण मानवी हक्कांचे उल्लंघन असे अतिरेकी करतच असतात.
   
फ. आंतराष्ट्रीय कायद्यांच्या कागदपत्रांचा अभ्यास करून त्याप्रमाणे सरकारकडे मानवी हक्कांचे संरक्षणासाठी सुचना करणे.
   
ग. मानवी हक्कांचे संरक्षणासाठी देशांतर्गत अभ्यास करणे व योग्य अशी माहिती गोळा करणे.
   
ह. मानवी हक्कांचे संरक्षणासाठी सामान्य लोकांना अवगत करणे साक्षर बनविणे त्यासाठी विविध माध्यमांचा वापर करणे.
   
य. सामाजिक संस्थांना मानवी हक्कांचे संरक्षणासाठी काम करण्यास उत्तेजना देणे त्यांना प्रोत्साहन देणे.
   
ज. वरील प्रमाणे असणाऱ्या इतर बाबी ज्यायोगे मानवी हक्कांचे संरक्षणासाठी उपयोग होईल.