Follow us on :

स्नेह जय महाराष्ट्र !
ह्युमन राईटस ही कल्पना माझ्या मनात ३ वर्षांपूर्वी आली कारण आजुबाजुचा परिसर हा वागणुकी वरून गलीच्छ झालेला दिसला. महिलांवर होणारा अन्याय, लहान मुलांना बालरोजगार होताना, विधवा महिला, परितक्त्या महिला, वेश्या महिला यांच्यावर लक्ष केंद्रीत केले जात नाही असे जेव्हा माझ्या निदर्शनास आले, तेव्हा मला ह्या गोष्टीची जाणिव होऊ लागली. मी गेल्या २० वर्षांपासुन राजकारणात होतो, तेव्हांपासुन माझा हा प्रवास चालूच आहे. परंतु शेवटी 'ससा ज्याच्या हाती तोच पारधी' अशी एक म्हण आहे. असो !...
एकदा माझ्या मनात आले की, मी या समाजावर होणाऱ्या अन्यायाबाबत वाचा फोडू शकतो, तेव्हां ही कल्पना अमलात आणली आणि सत्यवादी ह्युमन राईटस ह्या संघटनेची स्थापना केली. सत्यवादी म्हणजे सत्या साठी लढणारी आणि ह्युमन राईटस म्हणजे मानव हितासाठी लढणारी अशी ही संघटना आहे. सत्यासाठी लढण्याची एक ताकद आपल्या हातात घेऊन समाजावर होणारे अन्याय थांबविण्याची एक प्रखर मोहीम राबविण्याचे मी ठरविले, आणि त्यासाठी लागणारा प्रत्येक घटक हा आपल्या मदतीसाठी यावा ही सुद्धा अपेक्षा केली. त्याप्रमाणे मला या समाजातील प्रत्येक घटकापासून सहानुभुतीची, कार्य करण्याची मोहीम राबविण्याची, एकजुट राहण्याचे कार्य हातात घेण्याची संधी मिळाली.
धन्यवाद !
आपला नम्र

 

   लवकरच